टेनिस एल्बो बरा होतो का? बाह्मरुग्ण विभागात किंवा प्रायवेट क्लिनिकमधे येणारा प्रत्येक पेशण्टच्या मनात ही शंका असते. कारण सगळ्यांनी सचिन तेंडुलकरला टेनिस एल्बोचा त्रास सहन करताना बघितलेलं असतं. सचिनला जड बॅटने त्रास झाला, मी तर क्रिकेट किंवा टेनिस खेळत नाही. मग मला कसा हा त्रास झाला, हा प्रश्न बहुतेक वेळा पेशण्ट विचारतो.
मस्ल्सना हाडांशी टेण्डन्स जोडतात. टेण्डनला आतून सूज आल्यामुळे हाताचे कोपर दुखायला लागतात आणि यालाच टेनिस एल्बो असं म्हणतात. मात्र दुखत असतानाही हाताला आराम दिला नाही आणि हाताचा वापर सुरूच ठेवला, की वारंवार टेण्डनला दुखापत होत राहते आणि मग बरं व्हायला भरपूर वेळ लागतो.
हा आजार खेळाडूंना विशेषत: रॅकेट गेम्स उदा. टेनिस, बॅटमिण्टन खेळणाऱ्यांमधे जास्त आढळून येतो. पण हाताने जोर लावून खेळाव्या लागणाऱ्या लोकांमधे जास्त आढळून येतो. पण हाताने जोर लावून काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला हा त्रास होऊ शकतो उदा. धुतलेले कपडे पिळणाऱ्या गृहिणीलाही हा त्रास होऊ शकतो. म्हणून टेनिस खेळणाऱ्या लोकांनाच टेनिस एल्बो हा आजार होतो असं नव्हे.
लक्षणं :
हाताच्या कोपर्याच्या बाहेरच्या बाजूला सूज येणं. हाताची हालचाल करताना दुखणं. छोट्या वस्तू उदा. पाण्याचा ग्लास किंवा चहाचा कप उचलताना वेदना जाणवते. मुठीत काही घट्ट पकडल्यास त्रास होतो.
टेनिस एल्बोची त्रास आहे, असं कळताच त्वरित फिजिओथेरपिस्टला दाखवलं पाहिजे. मॅन्युअल थेरपीमधे वापरल्या जाणाऱ्या काही टेक्निक्सने ४-५ दिवसात पेशण्टला बराच आराम जाणवतो.
उपचार चालू असताना हाताला पूर्ण आराम मिळावा यासाठी काउण्टर फोर्स ब्रेसेस वापरायला सांगितलं जातं. टेपिंग टेक्निक्सनेही मसल्सना आधार दिला जातो. यामुळे मसल्स पूर्णपणे कार्यरत नसतात. म्हणून टेण्डनला वारंवार होणारी दुखापत टाळली जाते. आणि टेण्डन लवकर बरा होतो. आणि वेदना कमी झाल्या की दुखापतीमुळे निर्माण झालेलं मसल्सचं असंतुलन बरोबर केलं जातं. अशा रितीने टेनिस एल्बोवर उपचार करून फिजिओथेरपिस्ट पेशण्टचा हातं नॉर्मल करून पेशण्टला लवकर कार्यरत करतात.
टिप्स :
दुखत असलेल्या भागाला तीन वेळा १५-२० मिनिटं बर्फाने शेका.
हाताची हालचाल कमी करून हाताला आराम द्या.
दुखत असलेल्या हाताने जड वस्तू उचलू नका. एल्बो सपोर्ट वापरा.
Opmerkingen