काम करताना अचानक तुमच्या खांद्यात कधी कळ आली असेल, तर ठीक आहे, पण जर असं वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. खांद्यातून हात वर करताना किंवा खाली आणताना जर एक ठराविक मूवमेण्ट करतानाच खांद्यात कळ जाणवत असेल तर याला ‘पेनफूल आर्क सिण्ड्रोम,' असं म्हणतात. काहींना हात मागच्या बाजूला नेताना उदा. पॅण्टच्या मागच्या खिशात हात घालताना कळ जाणवते, तर काहींना हात वर करताना उदा. वरच्या शेल्फवरून वस्तू काढताना वेदना जाणवतात.
याची बरीच कारणं आहे. खांद्याला मार लागल्यामुळे किंवा जिममधे सिंगल वेट ट्रेनिंग एक्सरसाइज केल्यामुळे शोल्डर जॉइण्टला आधार देणारे रोटेटर कफ मसल्सला आतून सूज येते, त्यामुळे खांद्याची हालचाल करताना कुठल्या तरी एका दिशेला खांदा अडकल्यासारखा वाटतो आणि तेव्हा असह्य कंळ जाणवते. या स्टेजला “टेण्डिनायटिस' असं म्हणतात. ही या आजाराची पहिली स्टेज असल्यामुळे याच स्टेजला फिजिओथेरपिस्टला दाखवायला पाहिजे. या स्टेजमधे नको त्या एक्सरसाइज केल्यामुळेही त्रास वाढू शकतो, कारण अशाने आतमधे होणाऱ्या टेण्डन इम्पिजमेण्ट म्हणजे खांद्यातल्या टेण्डन्सवर पडणारा दाब वाढतो, परिणामी त्रासही वाढतो. म्हणून फिजिओथेरपिस्टला त्वरित कन्सल्ट करा.
जर वेळीच उपचार सुरू केला नाही, तर हळूहळू खांद्याच्या सगळ्याच ही मूवमेण्ट पेनफुल होत्तात आणि मग खांद्याची हालचाल करायला जमत नाही. कारण सांधा अगदी जाम झालेला असतो. यालाच 'फ्रोजन शोल्डर" असं म्हणतात. फ्रोजन शोल्डर खूप त्रासदायक आजार आहे, कारण होणाऱ्या वेदना एवढ्या तीव्र असतात की पेन किलर टॅबलेटचाही फारसा उपयोग होत नाही. म्हणून आजाराच्या सुरुवातीलाच उपचार चालू होणं आवश्यक आहे.
खांदेदुखी दुसऱ्या कारणामुळेही होऊ शकते. जसे, रुमेटॉइड आर्थायटिस, ऑस्टिओ आर्थायटिस, ट्रॉमॅटिक आर्थायटिस. कधीकधी मानेच्या आजारामुळेही खांद्यात वेदना जाणवतात. म्हणून तुम्हाला नेमकं कशामुळे खांद्यात दुखतंय, याचं निदान करूनच योग्य उपचार करायला हवेत.
Comentarios