top of page
drmanishaspinalphy

झोपताना उशी हवीच

मानेचं दुखणं किती त्रासदायक आहे हे आपण मागच्या लेखात वाचलं. पण हा आजार का होतो, मणक्यांमधे नेमके काय बदल होतात आणि ते का होतात, हे आपण जाणून घेऊ या.


साधारणपणे आपण जेव्हा कंबरेतून उभे राहतो किंवा ताठ बसतो तेव्हा आपले दोन्ही खांदे एकाच लेव्हलला असून आणि दोन्ही कान बरोबर खांद्यावर असतात. जर कंबरेतून जरा वाकून बसलं की आपली मान आणि मानेसोबत डोकंही पुढे सरकतं. याला फॉरवर्ड हेड पोश्चर म्हणतात यामळे कण्याला (SPINE) आधार देणाऱ्या लिगामेण्ट्सवर खूप ताण पडतो. हे ताणलेले लिगामेण्ट्स नंतर सतत होणाऱ्या वेदनेचं कारण ठरतात.





दुर्बल झालेल्या लिगामेण्ट्सचा आधार नसल्यामुळे मणक्यामधल्या गादीच्या अवभवती असणारे फायबर्स कमजोर होतात आणि मग गादी अगदी सहजरीत्या बाहेर येते आणि नसांवर दाब पडतो. तेव्हा वेदना मानेत नव्हे हातात जाणवायला लागतात. जर तुम्हाला सकाळी उठल्यावरच मानेत दुखतं आणि दिवसभरात दुखत नसेल तर याचा अर्थ असा, की दोष तुमच्या उशीत, मॅट्रेसमधे किंवा तुमच्या झोपायच्या पद्धतीत असावा. झोपायच्या पद्धतीत विशेषकरून पालथं, म्हणजे पोटावर झोपण्याची सवय असेल तर ही सवय सोडून द्या. कारण या Position मधे डोकं पूर्ण एका बाजूला असतं म्हणून मानेच्या वरच्या भागातील कण्यांवर खूप ताण पडतो.


दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पॉण्डिलायटिस या आजारामुळे तुम्हाला त्रास होत नाही. खरंतर तुमच्या फॉरवर्ड हेड पोस्चरमुळे मान स्टीफ होते, लिगामेण्ट्स ताणले जातात. मानेचे मसल्स टाइट होतात आणि तुमची मान दुखते. म्हणून स्पॉण्डिलायटिस झाला म्हणून घाबरू नका. तुम्ही नक्की बरे होऊ शकता.


हे लक्षात ठेवा

  • बेडवरून उठताना नेहमी एका कुशीवर वळून उठा, मान झटक्याने वळवू नका

  • शिंकताना मान झटक्याने एकदम खाली वाकवू नका

  • उशीशिवाय झोपू नका. जर झोपताना तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर सरवायकल पिलोचा वापर करा किंवा झोपताना उशीवर सर्वायकल रोल ठेवा.

  • सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, ताठ बसा, ताठ उभे राहा, ताठ चाला.

Recent Posts

See All

コメント


bottom of page