श्नावण एकदम मस्त सेलिब्रेट झालाच असेल, आता गणोशोत्सवाचं उत्साही वातावरण सगळीकडे आहे. या सगळ्या उत्सवांची मजा लुटताना निरनिराळे पदार्थ बनवणं, श्रावणात खेळ खेळणं असं बरंच काही आपण करत असतो. दिवसभर उत्साहाच्या भरात हे सगळं करतो खरं, पण रात्री अंथरुणाला पाठ टेकली की कंबरेच आलित्व जाणवायला लागतं.
आधीच्या लेखात आपण पाहिलं होतं की, बहुतेक लोकांना कंबरदुखी, पाठदुखी, सांधेदुखीचा त्रास आहे आणि या आजारांसाठी फिजिओधथेरपिस्टला कन्सल्ट केलं पाहिजे. बहुतेक लोकांना कंबरेत वाकून बसायची सवय असते. या सवयीमुळे पुढे आपल्याला किती मोठ्या आजाराला सामोरं जावं लागणार आहे याची कुणालाच कल्पना नसते. कंबरेत वाकून बसल्यास मणक्याला आधार देणाऱ्या लिगामेण्टसवर खूप ताण पडतो आणि कंबरदुखी सुरू होते.
कंबर जास्त वेळ वाकलेल्या अवस्थेत असली तर याचा परिणाम दोन मणक्यांमध्ये असणाऱ्या डिस्कवर होतो. कंबर जेव्हा वाकलेल्या अवस्थेत असते तेव्हा डिस्कंचं सॉफ्ट सेण्टर (nucleus) मागे सरकतं आणि कंबर ताठ केली की nucleus परत आपल्या पूर्वस्थितीत येतं. Nucleus मागे सरकल्यानंतर डिस्कच्या आजूबाजूला असणारे फायबर्सही ताणले जातात आणि अशा स्थितीत पटकन खाली वाकून वजनदार काही उचललं तर अगोदरच ताणलेल्या फायबर्संवर अजून ताण पडल्यामुळे फायबर्स फाटून डिस्क बाहेर येण्याचा धोका असतो. बाहेर आलेल्या डिंस्कला स्लिपडिस्क ( हाद्यद्वश्वश्वदस्न सद्दह्मष) असं म्हणतात. या डिस्कमुळे जेव्हा नस दाबली जाते तेव्हा पाय दुखायला लागतो, पायाला मुंग्या येतात, पाय बधीर होतो.
कंबरदुखीचे परिणाम :
कंबरंदुखीमुळे एका पायात खूप: दुखतं
दुखण्यामुळे. खाली वाकायला वाकताना दुखणं वाढतं .
सकाळी उठल्यावर दुखण्यामुळे कंबर ताठ करायला जमत नाही .
शिंकताना किंवा खोकताना कंबरदुखी वाढते.
दुखण्यामुळे १०-१५ मिनिटांहून जास्त वेळ बसायला जमत नाही.
या परिणामांची तीव्रता टाळण्यासाठी लवकरात ल॑वकर स्पेशलाईज्ड फिजिओथेरपीस्टला कन्स्लट करून आजाराचं निदान करून योग्य उपचार करणं गरजेचं आहे. मेकॅनिकल डायग्नोसिस अँण्ड थेरपी या आधुनिक उपचारपद्धतीने मणक्याच्या आजारांवर विशेषतः स्लिप डिस्कसारख्या आजारावर उपचार करून फिजिओथेरपीस्ट रुग्णाला लवकरात लवकर ऑक्टिव्ह करतात. यामुळे रोग्याला जास्त दिवस बेड रेस्टचीही गरज पडत नाही.
Comentarios