top of page
drmanishaspinalphy

टाचा का दुखतात?

कंबरदुखी ,गुडघेदुखीसारखंच टाचेचं दुखणंही बऱ्याच लोकांना हैराण करून सोडतं.


या आजाराची लक्षणं म्हणजे टाचेत आणि तळव्यांच्या मधल्या भागात वेदना जाणवतात. दुखण्यामुळे सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय टेकवताना त्रास होतो. जास्त वेळ बसून राहिल्यावर उठताना पंजा जमिनीवर टेकवताना टाच दुखते, मात्र थोडी पावलं चालल्यावर त्या वेदना कमी होतात.


पण टाचेच्या या दुखण्यामागे नेमकं कारंण काय?


तळपायापासून टाचेपर्यंत पसरलेला फ़ेशिया काही कारणांमुळे दुखावला जातो. त्यामुळे या फेशियाला आतून सूज येते आणि टाच दुखायला सुरुवात होते. यामागेही बरीच कारण आहेत.





  • कडक इन्सोलच्या बुटांमुळे हिवा सॅण्डल्समुळे.

  • फूटवेअरला व्यवस्थित हिल सपोर्ट नसल्यामुळे.

  • उंच टाचेच्या चपला दीर्घकाळ वापरल्यामुळे.

  • फ्लॅट फूट म्हणजे सपाट पाय असल्यास फेशिया सतत दुखावतो आणि टाच दुखते.

  • पायाचे स्नायू टाइट असल्यामुळेही पंजा आणि टाचा दुखतात.

  • ज्यांना सतत उभं राहून काम करावं लागतं. अशा लोकांमधे टाचेचं नॅचरल कुशन आकसलं जातं आणि भार सहन करण्याची क्षमता कमी होते

  • जास्त वजन असणाऱ्या , लोकांनाही हा आजार होण्याचा धोका असतो. वेळीच दखल न घेतल्यास हा इरिटेटेड फेशिया अजून इरिटेड होतो आणि आतून हाड वाढायला सुरुवात होते आणि मग टाच अजून जास्त दुखायला लागते.

हे लक्षात ठेवा

  • टाच १५-२० मिनिट बर्फाने शेका .

  • जास्त वेळ उभं राहणं टाळा. त्रास जास्त असल्यास जॉगिंग, धावणं टाळा

  • शूजमधे हिल कप्स किंवा स्कूप्ड हिल्सचा वापर करा.

  • बेडवरून खाली उतरायच्या आधी पंजे वर-खाली करा. नंतर खाली उतरून बोटांवर उभा राहा. असं ८- १० वेळा करा. म्हणजे सकाळी पाय जमिनीवर नीट ठेवता येतील.





जर अधूनमधून पायांचं दुखणं जाणवत असेल तर तुमचे पाय विशेषत: पंजे तपासून घ्या. ज्यांचे पाय सपाट असतात अशा लोकांना भविष्यात पायाचा आणि गुडघ्याचा त्रास होण्याची शक्‍यता असते. कित्येक लोकांना त्यांचे पाय सपाट आहे हे माहीतच नसतं तुमच्या फिजिओथेरपिस्टला असं वाटलं की “फ्लॅट फूट” असल्यामुळे म्हणजे पाय सपाट असल्यामुळे तुम्हाला पायाचा किंवा गुडघ्याचा त्रास होतो. तर ते त्यानुसार ट्रौटमेण्ट करतात. शूजमधे योग्य ते बदल करण्याचा सल्ला देतात. उदा. शूजमधे वेलगस पॅड किंवा मिडिअल वेज वापरल्यास दुखण्यात बराच फरक जाणवतो.


कुठलाही आजाराची वेळीच दखल घेतली, तर तो बरा होऊ शकतो. म्हणून दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका.

Recent Posts

See All

Comments


bottom of page