top of page
drmanishaspinalphy

फिट राहा,पण जरा जपून

तुम्ही फिट राहण्यासाठी काय करता, असं कोणी विचारल्यास फिटनेससाठी काहीही न करणारा माणूस नक्कीच गांगरतो. या गोष्टीची खंत व्यक्‍त करत तो विचार करतो, की उद्यापासून मी पण माझ्या फ्रेण्डसांरखा एखाद्या फिटनेस रेजिमला सुरूवात करणार. व्यायाम करा फिट राहा, हा सल्ला जो तो देत असतो.


फिटनेसबद्दलची माहिती ही हल्ली सगळीकडेच उपलब्ध आहे. हेल्थ मॅगझिनमधे, इण्टरनेटवर, वर्तमानपत्रात किंवा टीवीवर फिटनेसविषयी खूप काही सांगितलं जातं. म्हणूनच बरेच लोक कुठे तरी वाचून किंवा टीवीवर बघून व्यायाम करायला सुरुवात करतात. मात्र, योग्य मार्गदर्शन आणि देखरेखीशिवाय कुठलाही फिटनेस रेजिम पत्करल्यास दुखापत होण्याचा धोका असतो. व्यायामामुळे दुखापत झाली, की पुन्हा ती व्यक्‍ती व्यायाम करण्याचं धाडस करत नाही. शिवाय पुन्हा तेवढाच उत्साह निर्माण करणं जरा कठीण जातं. फिटनेस रेजिममुळे होणाऱ्या इंज्युरीजवर चर्चा करू या.





आज काल बरेच लोक कामाच्या वेळात कम्प्युटटसमोर आणि फावला वेळात ठीवीसमोर बसून राहतात. हालचाल कमी असल्यामुळे सांधे स्टीफ होतात, मसल्समधे टाइटनेस निर्माण होतो. सांध्यात स्टीफनेस असल्यास आणि फ्लेक्सिबिलिटी नसल्यास सांधा भार घेण्यासाठी सशक्त नसतो. अशा स्थितीत कुठल्या तरी चुकीच्या व्यायाममुळे येणारा भार सांध्यासाठी किंवा मसल्स वा लिगामेण्टसाठी धोकादायक ठर शकाते. फ्लेक्सिबिलिटी कमी असल्यास दुखापत होण्याची शक्यता दाट असते.


तसंच तासनतास चुकीच्या पद्धतीत बसल्यामुळे कण्यात झालेले बदल म्हणजे अति ताणलेले लिगामेंट्स म्हणा किंवा आपल्या जागेवरून शिफ्ट झालेल्या डिस्कमुळे भविष्यात मोठा त्रास होण्याची शक्‍यता असते. म्हणून गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा मानेचं दुखणं असणाऱ्या पेशण्ट्सनी खास काळजी घेतली पाहिजे.


असले आजार असल्यास आधी फिजिओथेरपीने तुमचा त्रास नाहीसा करा आणि अगदी वेदनेमुक्‍त झाल्यावरही फिजिओथरपिस्टकडून एक चेक-अप करून घ्या. मग तुमच्या फिटनेस रेजिमला सुरुवात करा. तुम्ही दुखापती कशा ठाळू शकता याचा सल्लाही तुम्हाला फिजिओथेरपिस्ट देतात. मात्र झालेल्या दुखापतीकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार करून घ्या. तुम्हाला योग्य वाटणारा आणिं तुमच्या शरीरसृष्टीला सुट होणाऱ्या फिटनेस रेजिमने तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल आणि तुम्हाला रोज करायलाही आवडेल.


सो एक्झरसाइज इन अ राइट वे अँण्ड स्टे फिट.

Comments


bottom of page