मुंबईला 'धावतं शहर' म्हणतात तै उगाच नव्हे. रस्त्यावर बघा किंवा प्लॅटफॉर्मवर. जो तो पळत सुटलेला दिसतो. एवढ्या घाईगडबडीत आणि धावपळीत पाय मुरगळणं साहजिकच आहे. पाय मुरगळला म्हणजे नक्की काय होतं ते समजून घेऊ पाय मुरगळणं म्हणजे लिगामेण्ट्सला दु:खापत होणं याला 'अँकल स्प्रेन ' म्हणतात. लिगामेण्ट्स अती ताणले गेल्यास लिगामेंट्स इंज्युरी, म्हणजेच स्प्रेन होते.
लक्षणं : पायाला सूज येणं विशेषत: घोट्याच्या आजूबाजूला आणि पंज्याला सूज येणं.
दुखणं जास्त असल्यामुळे पंजा हलवता न येणं. पायावर भार देऊन चालणं अशक्य होणं, असं झालं की बरेच जण घरच्या घरीच उपाय करतात. हळदीचा लेप लावून पाय बांधून ठेवला की झालं. फारतर सूज आणि वेदना कमी करण्यासाठी गोळ्या घेतल्या की झाली ट्रीटमेण्ट. सूज उतरली, वेदना होत नाही म्हणून तुम्ही बरेच झा अशी समजूत चुकीची आहे.
स्प्रेननंतर आजूबाजूचे मसल्स कमजोर होतात. दुखापतीमुळे लिंगामेण्ट्सचे फायबर्सही लूज कमजोर होतात. मसल्स आणि लिगामेण्ट्समुळेच तर सांध्याला आधार असतो. सांध्याला आधार देणारे हे फायबर्स कमजोर झाले तर सांधा अस्थिर होतो. आणि परत पाय मुरगळण्याची शक्यता वाढत जाते. अशा दुखापतीमुळे सांध्यात स्टीफनेसही निर्माण होतो म्हणजे सांध्याची हालचाल आधीपेक्षा कमी व्हायला लागते. आणि चालताना पाऊल व्यवस्थित पडत नाही. 'चालण्यात बदल झाल्यामुळे गुडघ्यात किंवा कमरतेही दुखायला सुरुवात होते. तसंच अँकल स्प्रेनमुळे पायामधे असलेले सेन्सर्स, ज्याला प्रोप्रायोसेपटर्स असे म्हणतात. ते खराब होतात.
जेव्हा आपण खराब, म्हणजे ओबडधोबड रस्त्यावर चालत असतो तेव्हा आपला तोल जावून आपण पडू नये म्हणून हे प्रोप्रायोसेपटर्स सतत कार्यरत असतात. म्हणून अँकल स्प्रेन झाल्यास स्पेशलाइस्ड फिजिओथेरपिस्टला कन्सल्ट करा. ते तुम्हाला तुमच्या स्प्रेनच्या तीव्रतेनुसार तुमच्यावर उपचार करतात. सुरुवातीला अल्ट्रासाउण्ड आणि टेपिंग ने सूज आणि वेदना कमी केल्या जातात. त्यानंतर कमजोर मसल्सकडे लक्ष दिलं जातं. आणि शेवटी प्रोप्रायोसेप्शन ट्रेनिंग सुरू केली जाते. यासाठी वॉबल बोर्ड कधी किती दिवसांनी वापरायला सुरुवात करायची हे फिजिओथेरपिस्टच सांगू शकतात. अशाने भविष्यात परत अँकल स्प्रेन होण्याची शक्यता नक्कीच कमी होऊ शकते.
टिप्स: १५-२० मिनिट बर्फाचा शेक करा बर्फाने शेका. क्रेप बॅण्डेज घट्ट बांधून पाय दोन उशांवर ताठ ठेवा आणि पायाची बोटं वर खाली करा. पायावर भार देऊ नका. पूर्ण विश्रांती घ्या.
Komentáře